प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 March 2019

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं. सोलापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दिला.
रण्याआधी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितीत पदयात्रेला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली.

सकाळी साडे नऊ वाजल्यापासून न्यु बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. अकरा पंचेचाळीस वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आगमन झाले. उद्यानांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला होता. निळा, हिरवा, पिवळा आधी रंगाचे झेंडे कार्यकर्ते हातामध्ये घेऊन घोषणाबाजी करीत होते. दुपारी एकच्या सुमारास डॉ़ प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याच्याकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एमआयएमचे तौफिक शेख, श्रीशैल गायकवाड, शमीउल्लाह शेख, शंकरराव लिंगे, धम्मपाल माशाळकर आदी उपस्थित होते़

Post Top Ad

test