“भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका”

मुंबई (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षाच्या अपयशी कारभाराचा पंचनामा करणारऱ्या “भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका” या पुस्तिकेचे प्रकाशन व लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन शनिवारी टिळक भवन येथे करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, निरीक्षक मधुसुदन मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार राजीव सातव, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, सुरेश शेट्टी, अमरीश पटेल, नसीम खान, रजनीताई पाटील, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, संपत कुमार, बी. एम. संदीप, माजी मंत्री बस्वराज पाटील, कृपाशंकर सिंह, आमदार विश्वजीत कदम, आदी उपस्थित होते. 
 
प्रवीण गायकवाड यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश -

संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शनिवारी टिळक भवन येथे झालेल्या सोहळ्यात संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण. जिजाऊ ब्रिग्रेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्ष सारिका भोसले, माजी पुणे जिल्हाध्यक्ष प्राचीताई दुधाने, अजयसिंह सावंत, विशाल तोळवे, प्रमोद गोतारणे, सुहास गायकवाड, प्रफुल्ल गुजर पाटील, अभिजीत जेधे, अमोल जाधवराव, राजेश देशमुख, किशोर मोदी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याच कार्यक्रमात भिवंडी येथील फाझील अन्सारी व अन्सर अन्सारी यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.