Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत पोलीसांनी 12 लाख रु. संशयीत रक्कम पकडली


मुंबई, दि.5: मुंबई शहर जिल्हयात काल पोलीस विभागाच्या पथकाव्दारे शिवडी परिसरात 12 लाख रुपये संशयीत रक्कम पकडली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, दि. 05 एप्रिल 2019 रोजी गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री 2:30 वाजताचे सुमारास शिवडी पोलीस ठाण्याचे हद्दीत शिवडी पोलीस ठाण्याचे रात्रपाळी पोलीस निरीक्षक श्री. चंदनशिवे व त्यांचे पथक गस्त करीत असता पांढऱ्या रंगाच्या टुरिस्ट होन्डा एक्सेंट प्राईम मोटार कार क्र.एम.एच.04 जे.के.2263 या वाहनाची तपासणी केली. या वाहनात जुबेर समिउल्ला खान (वय 24), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (वय 25), युसुफ उस्मान शेख (वय 30) आणि अकबर सलिम पठाण (वय 31) होते. या इसमांपैकी जुबेर समिउल्ला खान यांचेजवळ शोल्डर बॅग होती. या बॅगमध्ये पैसे असल्याचे सांगितल्याने उपरोक्त नमुद इसमांना ताब्यात घेऊन शिवडी पोलीस ठाणे येथे चौकशीकरीता आणण्यात आले. यानंतर दोन पंच बोलावुन त्यांच्यासमक्ष पंचनामा केला असता बॅगमध्ये एकुण रु.12,01,500/- (अक्षरी रुपये बारा लाख एक हजार पाचशे) इतकी रक्कम आढळुन आली. याबाबत विचारणा केली असता सदर इसमाने ही रक्कम तो करीत असलेल्या धंदयासाठी जमा केल्याचे सांगितले. परंतू, सदरची रक्कम धंदयासाठी कोणाकडून जमा केली याबाबत काही एक समाधानकारक माहिती दिली नाही. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom