मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारक

Share This
मुंबई, दि. 4 : मतदार यादीत नाव नसले तरी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटच्या तरतुदीनुसार मतदान करता येईल, हे विधान वस्तुस्थितीशी विसंगत असून मतदार यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही. तसेच प्रदत्त मत (टेंडर वोट) बाबतही चुकीची माहिती पोस्टमध्ये नमूद आहे. एकूण मतांमध्ये 14 टक्के टेंडर वोट असल्यास संबंधित मतदान केंद्रांवर फेरमतदान (रीपोल) घेण्यात येईल, हे विधान देखील वस्तुस्थितीला धरून नसून अशी कोणतीही तरतूद नसल्याचे मुख्य निवडणूक अधिेकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. व्हॉटस्अॅप वर व्हायरल झालेल्या एका पोस्टच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages