मुंबईकरांना मिळणार फायर सेफ्टीचे धडे ! - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

10 April 2019

मुंबईकरांना मिळणार फायर सेफ्टीचे धडे !

मुंबई - आगीच्या दुर्घटनांमध्ये बचावकार्यात अग्निशमन दलाप्रमाणे स्थानिक रहिवाशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन, माहितीच्या माध्यमातून मुंबईकरांना ‘फायर सेफ्टी’चे धडे दिले जाणार आहेत. यावेळी रुग्णालयांमध्येही विविध उपक्रमांच्या माध्यमातून बचावकार्यात मदत होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. यानिमित्ताने अग्निशमन दलाच्या कामाची माहितीही नागरिकांना मिळू शकेल. येत्या १४ ते २० एप्रिल या अग्निशमन सप्ताहानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मुंबईत झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण, प्रचंड वेगाने वाढणार्‍या रहिवासी इमारतींच्या संख्येमुळे अग्निसुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येत आहे. अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून नियमितपणे सर्वेक्षण करून कारवाईदेखील करण्यात येत आहे. आगीसारख्या घटनांमध्ये रहिवाशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर नागरिकांना अग्निसुरक्षेची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी आयोजित करणार्‍या उपक्रमाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. 
 
१४ ते २० एप्रिल अग्निशमन सप्ताह --
मुंबईत १४ ते २० एप्रिल या कालावधीत चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, घाटकोपर, बोरिवली आदी रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. यामध्ये अग्निशमन दल कोणत्या प्रकारे काम करते, उपलब्ध असणारी अत्याधुनिक साधनसामग्री, आगामी नवीन उपक्रम यांची माहिती दिली जाईल. शिवाय आग लागल्यास रहिवाशांनी तातडीने फायर कॉल कुठे-कसा करावा, स्वत: बचावकार्यात कशी मदत करावी, आगीसारख्या दुर्घटनेत कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

Post Top Ad

test