अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2019

अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक


कोलकाता - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान शहा यांच्या दिशेने काठी भिरकावण्यात आल्याने जोरदार संघर्ष पेटला. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. अमित शहा यांच्या रोड शोसाठी आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान, शहा यांचा ताफा कोलकातातील बिधान सराई भागातील कॉलेज हॉस्टेलजवळून जात असताना शहा ज्या ट्रकवर होते त्या ट्रकच्या दिशेने काठ्या भिरकावण्यात आल्या. हॉस्टेलमधून शहा यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यानंतर तणाव निर्माण झाला असून भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलच्या इमारतीला घेराव घालत हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे जाळपोळही झाल्याची दृष्ये हाती येत आहेत.

Post Bottom Ad