सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार, एकाला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2019

सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार, एकाला अटक


मुंबई - पुणे जिल्ह्यातील एका खेड्यातून उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना सायन रुग्णालयात घडली. ही घटना रविवारी उघडकीस येताच सायन पोलिसांनी धारावीमध्ये राहणाऱ्या दीपक कुंचीकुर्वे (३१) याला अटक केली. या घटनेमुळे राज्यभरातून उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पुण्यातील एका गरीब कुटुंबातील ३७ वर्षांची महिला किडनीचा त्रास असल्यामुळे बहिणीला घेऊन उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात आली होती. ही महिला एकटीच असल्याचे पाहून शनिवारी दुपारी दीपक तिच्याजवळ गेला. रुग्णालयाचे बिल कमी करण्यासाठी एक अर्ज करावा लागतो तो मिळवून देतो, असे सांगून दीपकने तिला ओपीडी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर नेले व तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची तक्रार महिलेने सायन पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दीपकला शोधून काढले. दीपक धारावीतील एका झोपडीत राहत असून रुग्णालयात चोऱ्या करण्यासाठी येत असतो. मदतीच्या बहाण्याने तो रुग्णांच्या नातेवाईकांची सतत फसवणूक करीत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले असल्याचे सायन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ललिता पवार यांनी सांगितले. दरम्यान, आरोपीला सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Post Bottom Ad