लेदरच्या कारखान्यात आग, महिला जखमी


मुंबई - भायखळा येथील खटाव पत्रा चाळीतील एका लेदर बॅगा बनवण्याच्या कारखान्यात स्टोव्ह चा भडका उडून लागलेल्या आगीत एका महिला जखमी झाली. सदर महिलेवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. 

खटाव पत्रा चाळ क्रमांक ५, टॅंक पाखाडी मार्गावर बॅगा बनवण्याचा कारखाना आहे. अचानक तेथे असलेल्या पेटत्या स्टोव्हचा स्फोट होऊन भडका उडून आग लागली. यामध्ये तिथे असलेली महिला २५ टक्के भाजली असून तिला तात्काळ जवळच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आगीवर काही मिनिटांतच नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनेबाबत अधिक तपास सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
Tags