Type Here to Get Search Results !

साडी सेंटरला भीषण आग; ५ कामगारांचा होरपळून मृत्यू


पुणे - देवाची ऊरळी येथे राजयोग साडी सेंटरला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीत दुकानात अडकलेल्या ५ कर्मचाऱ्यांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र या भीषण आगीत दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले आहे. या दुकानातील कामगार परप्रांतातून कामासाठी येथे आल्याचे समजते. त्यामुळे ते याच दुकानात रात्री झोपायचे. या कामगारांचा या आगीत मृत्यू झाला आहे. 

Top Post Ad

Below Post Ad