बोरिवली नॅशनल पार्कमधील पांढऱ्या वाघाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2019

बोरिवली नॅशनल पार्कमधील पांढऱ्या वाघाचा मृत्यू


मुंबई - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचं आकर्षणाचं केंद्र असलेल्या 'बाजीराव' या पांढऱ्या वाघाने आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या १८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेणारा बाजीराव हा नॅशनल पार्कमधील सर्वात वृद्ध वाघ होता. त्याच्या निधनाने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वयोमानामुळे बाजीरावचं निधन झालं असून त्याचं शववविच्छेदन करण्यात येणार असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. २००१मध्ये त्याचा जन्म झाला होता. गेल्या चार वर्षांपासून तो संधीवात आणि स्नायुदुखीमुळे त्रस्त होता. त्यामुळे तो जायबंदी झाला होता. गेल्या दहा दिवसांपासून त्याने चालणंही बंद केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.

Post Bottom Ad