समुद्रात बुडून दोन जणांचा मृत्यू

मुंबई - मुंबईला लागून असलेल्या मरीन ड्राईव्ह व जुहू येथे समुद्रात दोन जण बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. यात एका ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. 

मरिन ड्राईव्ह येथील सुंदर महल जंक्शनजवळ एक मुलगा समुद्रात बुडाला. त्याला समुद्रातून बाहेर काढून तात्काळ जिटी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत् घोषित करण्यात आले. भैरव रमेश बारिया (११) असे या मुलाचे नाव आहे. तर जुहू सिल्व्हर ब्रिज येथील इस्कॉन मंदिराजवळील गोदरेज चौपाटी येथे रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक जण समुद्रात बुडून मृत्यू झाला. महेश मारुती मोरे (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
Previous Post Next Post