नाल्यांच्या स्वच्छतेसाठी ट्रॅश ब्रूम यंत्रणा कार्यान्वित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाल्यांच्या स्वच्छतेसाठी ट्रॅश ब्रूम यंत्रणा कार्यान्वित

Share This
मुंबई - भरतीच्या वेळी नाल्यातील कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी शहर व पश्चिम उपनगरातील नाल्यांत ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. लवकरच पूर्व उपनगरातील नाल्यांतही ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेमुळे नाल्यातील कचरा साफ होण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील विशेषतः झोपडपट्टयां परिसरात रहिवाशी नाल्यांमध्ये कचरा टाकतात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा साचून तो नाल्यांच्या पाण्यावर तरंगत प्रवाहाद्वारे समुद्रात मिसळतो. त्यानंतर हाच कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनानाऱ्यावर फेकला जातो. नाल्यांमधील हा कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी, पालिकेने नाल्यांमध्ये ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे नाल्यांसह समुद्रही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. दहिसर नाला, पोईसर नदी, इर्ला पम्पिंग स्टेशन, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन, एसएनडीटी नाला, पी अँड टी नाला, मेन अ‍ॅव्हेन्यू नाला, ओशिवरा नदी, मोगरा नाला या ठिकाणी ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

नाल्यांमध्ये टाकलेला कचरा हा नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत जातो.तरंगणारा कचरा नाल्याच्या प्रवाहासोबत वाहत समुद्राच्या दिशेने जाऊन पाण्यातमिसळतो. त्यामुळे या ठिकाणी ट्रॅश ब्रूम यंत्रणा बसविण्यता आली आहे. या ट्रॅश ब्रूम यंत्रणेमुळे नाल्याच्या प्रवाहासोबत पाण्यावर तंरगणारा कचरा अडवला जाणार आहे. अडवलेला कचरा पालिकेकडून काढण्यात येणार असून त्यामुळे वेळेत नालाही साफ होण्यास मदत होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages