२१ पूल बंद - लोकांनी सहकार्य करावे, महापौरांचे आवाहन

Anonymous
मुंबई - हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापलिकेने मुंबईतील पुलांचे सर्वेक्षण करून त्यात आढललेल्या धोकादायक पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. यात २९ धोकादायक पुलांपैकी ८ पूल पाडण्यात आले व अजूनही २१ पूल धोकादायक स्थितीत आहेत. हे पूल लोकांच्या सुरक्षिततेसाठीच बंद करण्यात आले आहेत. मुंबईकरांनी सहकार्य़ करावे, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. 

मुंबईतील पुलांच्या केलेल्या पाहणीत धोकादायक आढळले पूल बंद करण्यात आले आहे. या पुलांचे काम पावसानंतर म्हणजे ऑक्टोबरपासून हाती घेतले जाणार आहे. मात्र पूल अचानक बंद केले जात असल्याने वाहतूक कोंडी व मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. थोड्या पावसांत जागोजागी मुंबईत पाणी तुंबते अशावेळी पूलही बंद राहिल्यास वाहतूक कोंडी होईल व पाणी तुंबून लोकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर हे पूल धोकादायक आहेत. या पुलांचे काम पावसात केले जाणार नाही. लोकांच्या जीवासाठीच पूल बंद करण्यात आले असून लोकांनी सहकार्य करायला हवे असे महापौर म्हणाले.
Tags