शिवसेनेचा लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा - संजय राऊत - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 June 2019

शिवसेनेचा लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा - संजय राऊत


नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक विजयात बहुमताचा आकडा पार करत भाजपाचे ३०३ खासदार निवडणून आले, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आले. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपानंतर शिवसेना हा सर्वाधिक विजयी खासदार असलेला पक्ष ठरला. मात्र त्यांना केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ते देखील अवजड उद्योग खाते. यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता शिवसेनेने लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. ‘एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपद मिळणे आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद आम्हालाच मिळाले पाहिजे’, असे संजय राऊत यांनी म्हटले. दरम्यान, खासदारसंख्या पाहता लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे राहील. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे.

Post Top Ad

test