एमटीएनएल आग - दोन मॅनेजरवर गुन्हा दाखल

Anonymous

मुंबई - वांद्रे पश्चिम येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कंपनीच्या इमारतीला आग लागली, आगीला कंपनी जबाबदार असून महाव्यवस्थापक व उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात कंपनीच्या निष्काळजीपणाविरोधात दगुन्हा दाखल केल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

के.सी. मागॅ, वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला गेल्या वर्षीही आग लागली होती. या दुर्घटनेनंतर #इमारतीत आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई अग्निशमन दलाने कंपनीला दिले होत. त्यानंतर कंपनीने आदेशाचे पालन करत आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. मात्र २२ जुलैला पुन्हा एकदा एमटीएनएल इमारतीला आग लागली आणि आग प्रतिबंधक उपाययोजनाच बंद असल्याचे स्पष्ट झाले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून सिनियर मॅनेजर एस. डी. पंडितराव व डेप्युटी मॅनेजर आर.बी. यादव यांच्यासह कंपनी विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी डाॅ. प्रभात रंहागदळे यांनी सांगितले. दरम्यान, पायधुनी अब्दुल रेहमान स्ट्रीट, तयाब बिल्डींग या इमारतीच्या स्टेशनरी दुकानाला आग लागली होती. ही आग झपाट्याने पसरल्याने लेवल ४ ची झाली होती. ही आग कशामुळे लागली याची चाैकशी सुरु असल्याचे ते म्हणाले.
Tags