Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव काळात बस पार्किंगसाठी एसटीला जागा माफक दरात देण्याची मागणी


मुंबई - १३ ऑगस्ट २०१९ - येणाऱ्या गणेशोत्सव काळात राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसगाड्याना ना बेस्टच्या आणिक व प्रतीक्षा नगर आगारात उभ्या करण्याची परवानगी द्यावी व त्या बसगाड्याना कोणतेही शुल्क आकारू नये अशी मागणी आज बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली , मात्र माफक दरात देण्याबद्दल आपण परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून कार्यवाही करू असे आश्वासन यावेळी बेस्ट महाव्यवस्थापकांनी दिले . 

गणपती उत्सव काळात कोकणात जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबईतून कोकणात दरवर्षी जादा बसगाड्या सोडल्या जातात .यासाठी १२०० जादा बस गाड्याची गरज एस टीला लागते . दरवर्षी जादा २००० च्या आसपास बस सोडल्या जातात . या वर्षी हि सांख्य २२०० च्या वर आहे . या बसेस ची मागणी पूर्ण करण्यासाठी एस टी महामंडळाला पुणे , नाशिक , औरंगाबाद , अमरावती व नागपूर या विभागातून बस आणाव्या लागतात . त्या बस गणपती उत्सव काळात आठवडा पूर्वी मुंबई शहरात दाखल होत असतात . या बस गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या परळ , मुंबई सेंट्रल , व कुर्ला नेहरू नगर आगारात उभ्या केल्या जातात . मात्र तेथेही पार्किंगची मर्यादा असल्याने एस टीला वेगळ्या जागेची गरज पडते . यंदा एस टी महामंडळाने बेस्टला पत्र पाठवून बेस्टची आणिक व प्रतीक्षा नगर आगारातील जागेची मागणी केली आहे . 

बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य म्हणाले कि या पत्रावर बेस्टने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही . आज पश्चिम महाराष्ट्र , कोकण , व महाराष्ट्रातील बहुतांश भागात पूरसदृश परिस्तिथी निर्माण झाली आहे . त्यात एस टी महामंडळाला १०० कोटींच्या आसपास फटका बसला आहे , अशा परिस्तिथीत एस टी महामंडळाकडून भाड्यापोटी लाखो रुपये घेणे योग्य नसल्याचे सांगितले , यावर बोलताना महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले कि . एस टी बसगाड्याना मोफत पार्किंग देणे हे नियमात बसत नाही , बेस्ट ने नुकत्याच लागू केलेल्या बस आगारातीळल पार्किंग पॉलिसी नुसार २०० रुपये आकारण्यात येतील , मात्र परिवहन मंत्र्याबरोबर चर्चा करून पुढील तोडगा काढण्यात करण्यात येईल . व ती लवकरच सर्वाना कळवण्यात येईल .

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom