पश्चिम रेल्वे - फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला ८.३१ कोटींचा दंड

JPN NEWS
मुंबई - पश्चिम रेल्वे प्रशासनाने मे २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई केली आहे. या दरम्यान पश्चिम रेल्वेने जुलै महिन्याच्या अखेरीस फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत ८.३१ कोटींचा दंड वसूल केला आहे.

उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे, अशा घटनांच्या संख्याही वाढतच आहे. याबाबत गेल्या महिन्यामध्ये फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत पश्चिम रेल्वेने १ लाख ९० हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. पश्चिम रेल्वेने संपूर्ण एक वर्षाच्या कारवाईत ८ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने मे २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. यामध्ये २१५ भिकारी व ६४१ अनधिकृत फेरीवाल्यांकडून देखील दंड आकारण्यात आला. त्याचबरोबर ज्या प्रवाशांनी दंड भरण्यास नकार दिला अशा १२० लोकांना तुरुंगात टाकण्यात आले.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी विना तिकीट कारवाईमध्ये ११.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा पूरविल्या जाते. तसेच प्रवाशांसानी तिकीट काढवी या साठी त्यांची नियमित जनजागृती देखील केली जाते. तरी देखील लोक विना तिकीट प्रवास करतात. प्रवाशांनी असे करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !