जम्मू-काश्मीरमध्ये लँडलाईन सेवा सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2019

जम्मू-काश्मीरमध्ये लँडलाईन सेवा सुरू


श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये जास्तीत जास्त लँडलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यामध्ये औषधांसहीत इतर कोणत्याही वस्तूंची कमतरता पडू दिली गेली नाही, असं सांगतानाच येत्या १० ते १५ दिवसांत जम्मू-काश्मीरमधील लोकांची मतं बदललेली दिसतील, असा विश्वास जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केला.

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यापासून काश्मीरमध्ये आवश्यक वस्तू आणि औषधांची उणीव पडू दिलेली नाही. बकरी ईदच्या दिवशी आम्ही लोकांना घरपोच मटण, भाजीपाला अंडी नेऊन दिली. त्यामुळे येत्या १० ते १५ दिवसांत त्यांचा आमच्याविषयीचा दृष्टीकोण बदललेला असेल, असं मलिक म्हणाले. दरम्यान, श्रीनगरसहीत अनेक ठिकाणी लँडलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणं वगळता सर्वत्र लँडलाईन सेवा पूर्णपणे सुरू करण्याचं काम सुरू आहे. लाल चौक आणि प्रेस एन्क्लेव्हमध्ये लँडलाईन सेवा अद्यापही ठप्प आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर राज्यात बीएसएनएलसह अन्य खासगी इंटरनेट, मोबाईल आणि टेलिफोन सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. राज्यात अफवा पसरू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.

Post Bottom Ad