वंचित बहुजन आघाडीची २२ जणांची नावे जाहीर


मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील उपेक्षित असलेल्या समाजांकडून वंचित बहुजन आघाडीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितच्या पहिल्या यादीत 22 उमेदवारांचा समावेश असून लोकसभेप्रमाणेच या उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेखही करण्यात आला आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात 288 जागा लढवण्याची घोषणा केल्यानंतर 'एमआयएम'ने 80 जागांची मागणी केली होती. तसेच काही जागांवर 'वंबआ' आणि एमआयएम यांनी सारखाच दावा केला होता. त्यामुळे अखेर 'एमआयएम'ने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी दरवाजे खुले असल्याचे सांगितले होते. तर खासदार इम्तियाज जलील यांनीसुद्धा आघाडी करण्याबाबत हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची कार्यकर्त्यांना आशा आहे. दरम्यान एमआयएमने 2 याद्या जाहीर केल्या. मात्र, तरीही वंचित एमआयएमसोबत आघाडी कारण्यासाठी प्रतिक्षेत होती. मात्र आज आंबेडकर यांनी पहिली यादी प्रसिद्ध केली.

उमेदवारांची नावे -
सुरेश जाधव, शिराळा, रामोशी
डॉ. आनंद गुरव, करविर, गुरव
बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर, गोंधळी
बाळकृष्ण शंकर देसाई, कराड- दक्षिण, लोहार
डॉ. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव, नंदीवाले
दिपक नारायण शामदिरे, कोथरूड, कैकाडी
अनिल शंकर कु-हाडे, शिवाजी नगर, वडार
मिलिंद ई. काची, कसबा पेठ, काची- राजपूत,
शहानवाला जब्बार शेख, भोसरी, छप्परबंद
शाकिर इसालाल तांबोळी, इस्लामपूर, तांबोळी
किसन चव्हाण, पाथर्डी, शेवगाव, पारधी
अरुण जाधव, कर्जत जामखेड, कोल्हाटी
सुधीर शंकरराव पोतदार, औसा, सोनार
चंद्रलाल वकटुजी मेश्राम, ब्रम्हापुरी, ढिवर
अरविंद सांडेकर, चिमूर, माना
माधव कोहळे, राळेगाव, गोवारी
शेख शफी अब्दुल नबी शेख, जळगाव, पटवे, मुस्लीम,
लालसू नागोटी, अहेरी, माडिया
मणियार राजासाब, लातूर शहर, मणियार
नंदकिशोर कूयटे, मोर्शी, भोई
अॅड.आमोद बावने, वरेरा, ढिवर
अशोक विजय गायकवाड, कोपरगाव, भिल्ल