
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील स्मार्ट व्हिलेज या योजनेसाठी सामाजिक परिवर्तन संस्थेला व्हीएसटीएफ बालभारतीकडून १० कोटी रूपयांच्या निधीचा धनादेश आज शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड आशिष शेलार यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपुर्द केला.
ग्रामीण भागातील सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक परिवर्तन ही शासनाची संस्था काम करीत असून त्यांनी स्मार्ट व्हिलेज ही योजना हाती घेतली आहे. राज्यातील दुर्गंम अशा १००० गांवाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने शाश्वत विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अभियानातर्गंत शाळांमधून सर्व स्तरावर विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पक्की घरे, चांगल्या शाळा, पाणी पुरवठा, डिजिटल सुविधा, बालमृत्यूमध्ये घट करणे, वन्य जीव व जैव संरक्षण, सामुहिक शेतील प्रोत्साहन असे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत चालवण्यात येणा-या अभियानातून राबविण्यात येत आहेत. अशा प्रकारे राज्यातील अती ग्रामीण व दुर्गम भागातील खेंडयाच्या सर्वांगिण विकासासाठी काम करण्यात येत आहे. बालभारतीच्या उद्धीष्टांमध्ये अशा शैक्षणिक प्रकल्पांना मदत करणे हेही उद्धीष्ट असल्याने शालेय शिक्षण मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बालभारतीच्या बैठकीमध्ये या अभियानासाठी १० कोटी रूपये निधीची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्याचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ॲङ आशिष शेलार यांनी सुपुर्द केला. यावेळी बालभारतीचे संचालक विवेक गोसावीही उपस्थित होते.