Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपाकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओढा - मुख्यमंत्री


मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देश मजबूत करू शकतात आणि देशाचे भवितव्य घडवू शकतात, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओढा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. मा. मुख्यमंत्री व मा. प्रदेशाध्यक्ष यांनी मा. हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या आणि आ. प्रसाद लाड, आ. राज पुरोहित, आ. किसन कथोरे, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. आणि प्रदेश प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आपल्या राज्य सरकारने अनेक समस्यांना तोंड दिले आणि सकारात्मक पद्धतीने धाडसाने निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली निश्चित दिशेने काम केल्यामुळे राज्यातील भाजपा महायुती सरकारने अडचणीतून मार्ग काढला. आपल्या समस्यांवर हेच सरकार तोडगा काढू शकते व आपल्याला न्याय देऊ शकते, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जशी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनतेची भावना होती, तशीच सकारात्मकता जनतेमध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती सरकार मोठ्या बहुमताने विजयी होईल.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय विचारांच्या पक्षात प्रवेश करून हर्षवर्धन पाटील यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुभवामुळे पक्षाला बळकटी मिळेल.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांचे आपण मनापासून स्वागत करतो. त्यांनी दीर्घकाळ लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी प्रशासनामध्ये आपल्या कार्यपद्धतीने ठसा उमवटला आहे. त्यांचा योग्य सन्मान भाजपाकडून केला जाईल.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसात घटनेचे कलम 370 रद्द करण्यासोबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचे नेतृत्व केले आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. आपण भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अट घातलेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom