मतदानासाठी दिव्यांगांना देणार आधार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 October 2019

मतदानासाठी दिव्यांगांना देणार आधार


मुंबई - मुंबई शहरातील दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. त्यामुळे दिव्यांगांना मतदान करण्यास सुलभता येईल तसेच मतदानासाठी दिव्यांगांना मतदान केंद्रावर घेवून येण्याकरिता मतदानदूत म्हणून जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांच्याद्वारे परिसरातील दिव्यांगांची नोंद केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप‍जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने ही निवडणूक ‘सुलभ निवडणूक’ म्हणून जाहिर केली आहे. दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थानीही पुढाकार घेतला आहे. व्ही कॅन (V Citizen action network) या संस्थेच्या माध्यमातून जयहिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. असे श्रीमती मुकादम यांनी सांगितले.

दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्ही.कॅन सामाजिक संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून मदत करत असते. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या माध्यमातून जयहिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी दि.21 ऑक्टोंबर 2019 मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना मतदानदूत म्हणून सहकार्य करतील अशी माहिती व्ही. कॅन संस्थेचे अध्यक्षा श्रीमती इंद्राणी मलकाणी यांनी दिली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील दिव्यांग मतदारांच्या घरी जावून त्यांची नोंद करुन मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करण्यास व परत घरी सोडवण्यास हे विद्यार्थी मदत करणार असल्याची माहिती जयहिंद महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.अशोक वाडिया यांनी दिली.

या सामाजिक उपक्रमामध्ये जयहिंद महाविद्यालयाचे प्रा. अशोक सक्सेना यांच्या मार्गदर्शनानुसार पियुषा गुप्ता, रिया श्रीवास्तव, ओडिला रिबेलो, तानझिला खन्नन, प्रशांत दास, प्राची मिंदा, आकांशा सिंग, राजन प्रजापती, निशाका हे विद्यार्थी मतदानदूत म्हणून काम करणार आहेत. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी. मुंबई शहरातील मतदानाचा टक्का अधिक वाढावा यासाठी जयहिंद महाविद्यालयात नृत्य, देशभक्तीपर गीते याचे सादरीकरण करून “मतदान करा, राष्ट्रीय कर्तव्य बजावा” असा संदेश देण्यात आला.

Post Top Ad

test