AD BANNER

केईएम रुग्णालयात तोतया डॉक्टरला अटक


मुंबई - डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला केईएम रुग्णालयातून पोलीसांनी गुरूवारी अटक केली. नीरज शर्मा (२२, रा. जोगेश्वरी) असे या तोतया डॉक्टरचे नाव आहे. नीरजने रुग्णालयाच्या फार्मसी विभागातूनही काही औषधे घेऊन जोगेश्वरी येथे विक्री केल्याचे कबूल केले आहे. तो होमियोपॅथी डॉक्टर असल्याचे त्याने सांगितले आहे. नीरजला भोईवाडा पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

गेले काही महिने डॉक्टरसारखे अ‍ॅप्रन आणि स्टेथोस्कोप घेऊन केईएमच्या परिसरात तो फिरत होता. गरजू रुग्णांना हेरून एमआर, सिटीस्कॅन लवकर करून देतो, रांगेत उभे राहण्याऐवजी तातडीने उपचार करून देतो असे सांगत तो रुग्णांकडून पैसे उकळत होता. रुग्ण विभागामध्ये जाऊन मी विद्यार्थी असून माझे नातेवाईक असल्याचे सांगत या रुग्णांना थेट उपचारासाठी आत नेत असे. त्याने मोबाईलवर केईएम रुग्णालयाचे बनावट ओळखपत्र बनविले होते. 
Previous Post Next Post