एनडीएतून बाहेर पडण्याची औपचारिकता बाकी - संजय राऊत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2019

एनडीएतून बाहेर पडण्याची औपचारिकता बाकी - संजय राऊत


मुंबई - भाजपप्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची युती संपुष्टात आल्याचे शिक्कामोर्तब झालं आहे.

राजधानी दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एनडीएतील सर्व घटकपक्षांना याचं निमंत्रण आहे, पण शिवसेनेला याचं निमंत्रण मिळालेलं नाही. शिवसेनेने फारकत घेत असल्याची घोषणा करण्याअगोदरच भाजपने शिवसेनेला दूर केल्याचं चित्र केंद्रात दिसत आहे.



शिवसेनेच्या खासदारांना विरोधी बाकावर जागा? -
संसदेच्या दोन्ही सभागृहात शिवसेना आता विरोधी बाकावर दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार आणि गटनेते विनायक राऊत यांनीही याबाबत माहिती दिली. ‘शिवसेनेला एनडीएच्या बैठकीला आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीला जाणार आहोत, आम्ही बाहेर पडण्याबाबत अजून कुठेही जाहीर केलेलं नाही. राज्यसभेतील आमच्या खासदारांच्या आसन व्यवस्थेत बदल केल्याचंही कानावर आलं आहे. भाजपला ही दुर्बुद्धी सुचली असेल तरीही आम्हाला त्याचा फरक पडणार नाही,’ असं ते म्हणाले.

Post Bottom Ad