महापालिका बांधणार रेल्वे हद्दीत १२ नवे पूल - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

17 December 2019

महापालिका बांधणार रेल्वे हद्दीत १२ नवे पूल


मुंबई - रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीच्या वादामुळे १२ पूलांचे बांधकाम रखडले होते. आता हद्दीचा वाद मिटल्याने या पूलांचे काम मार्गी लागणार आहेत. शहरातील हे सर्व पूल असून त्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सल्ला घेणार आहे. तसेच बांधकामाच्या खर्चाचा भार महापालिका उचलणार आहे.

मुंबईत आजवर घडलेल्या रेल्वे दुर्घटनांनतर धोकादायक पूल बंद केले. तर काही हद्दींच्या वादामुळे रखडले होते. ये- जा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे हद्दीतील वादावर मात करुन पादचारी पूल व भुयारी मार्गाचे काम मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र रेल इंन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला सादर केला आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्क्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था महाराष्ट् शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असून महाराष्ट् राज्यातील विविध प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी त्यांच्यामार्फत होते. त्यानुसार मुंबईतील रेल्वेवरील पुलांच्या कामांसाठी या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. सल्लागाराच्या देखरेखीखाली सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ६८ पुलांची कामे करण्यात येत आहेत. तसेच मुंबईतील ११ रेल्वे पूल आणि १ भुयारी वाहतूक मार्गाचे काम संबंधित संस्था करणार आहे. या सर्व पुलांच्या कामांचा प्रकल्प खर्च महापालिकेच्या पूल विभागाकडून उचलला जाणार आहे. या सल्लागार सेवेसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के व्यवस्थापन शुल्क देण्यात येणार आहे. परंतु याबरोबरच सव्वा आठ टक्के देखभाल शुल्क आकारला जाणार असून रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या कामांसाठी एकूण खर्चाच्या १९.२५ टक्के एवढी रक्कम खर्च होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पुलांच्या खर्चाचा भार वाढणार असल्याचे प्रस्ताव म्हटले आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.

रेल्वे लाईनवरील पूल -
भायखळा रेल्वे लाईन पूल
ओलीवंट रेल्वे लाईन पूल
आर्थर रोड रेल्वे लाईन पूल,
गार्डन अर्थात एस ब्रिज रेल्वे लाईन पूल
रे रोड रेल्वे लाईनवरील पूल
करी रोड रेल्वे लाईनवरील पूल
बेलॉसिस रेल्वे लाईनवरील पूल
महालक्ष्मी स्टील रेल्वे लाईनवरील पूल
टिळक रेल्वे लाईनवरील पूल
डि.पी. रोडवरील मध्य रेल्वे ओलांडून जाणारा पूल

रेल्वे भूयारी मार्ग -
माटूंगा, लेबर कॅम्प जवळ, हार्बर लाईन

Post Top Ad

test