वर्ल्ड बँकने विकसनशील देशांच्या यादीतून भारताचे नाव वगळले ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2019

वर्ल्ड बँकने विकसनशील देशांच्या यादीतून भारताचे नाव वगळले !नवी दिल्ली - वर्ल्ड बँकने भारताचे विकसनशील देशांच्या यादीतील नाव रद्द केले आहे. त्यामुळे आता भारत “लोअर मिडल इन्कम कॅटेगिरी” मध्ये मोजला जाणार आहे. या नवीन आकडेवारीनुसार आता भारताचा समावेश जांबिया, घाना, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका सारख्या देशांच्या श्रेणीमध्ये होणार आहे. वर्ल्ड बँकेच्या नव्या यादीमध्ये भारताचे स्थान लोअर मिडल इन्कम कॅटेगरीमध्ये गेल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये भारताची नाचक्की झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भारतीयांसाठी सगळ्यात बातमी अशी आहे की, ब्रिक्सच्या प्रमुख देशांमध्ये भारत सोडून चीन, रशिया,दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील हे सर्व अप्पर मिडल इन्कम श्रेणीमध्ये येतात. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तान आणि नेपाळ हे दोन देश लो इन्कम कॅटेगरीमध्ये आहेत तर रशिया आणि सिंगापूर हाई इन्कम नॉन ओइसीडी आणि अमेरिका हाय इन्कम कॅटेगिरीमध्ये आहेत. या नव्या निर्धारण वर्ल्ड बँकेने अनेक मानकांच्या आधारावर केले आहे. यामध्ये मातृ मृत्युदर, व्यापार सुरू करण्यात लावण्यात येणारा ट्रॅक्स, टॅक्सचे कलेक्शन, स्टॉक मार्केट, वीज उत्पादन आणि साफसफाई असे मानक समाविष्ट आहेत.

भारताचा समावेश “लोवर मिडल इन्कम” श्रेणीमध्ये - 
ही बातमी समोर आल्यापासून सर्वच माध्यमांवर मोदी सरकारची नाचक्की होताना दिसत आहे. मोदींनी देशाला दाखवलेले विकासाचे स्वप्न आता धूसर होताना दिसत आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला जाताना दिसत आहे. आता भारताचा विकसनशील असा टॅग सुद्धा जाणार आहे. तर भारताचा समावेश आता “लोवर मिडल इन्कम” या श्रेणीमध्ये होणार आहे. 

Post Bottom Ad