कॉन्स्टेबल कांबळेची कोरोना टेस्ट का नाही? - किरीट सोमैया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2020

कॉन्स्टेबल कांबळेची कोरोना टेस्ट का नाही? - किरीट सोमैया


मुंबई - वरळी बीडीडी चाळीत राहणा-या ४८ वर्षीय कॉन्स्टेबल मंगेश कांबळेंचा काल सकाळी केईएम रुग्णालयात एडमिट करण्यात आल्यानंतर १० मिनिटांतच मृत्यू झाला. मंगेश कांबळेना कोवीड १९ ची लागण झाल्याची शंका आहे. तरीही त्यांची कोरोना टेस्ट का नाही? कांबळेंच्या मृत्यूचं कारण काय, राज्य सरकारचं दुर्लक्ष का असे प्रश्न भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी उपस्थित केले आहेत. 

वरळी बीडीडी चाळीत राहणा-या ४८ वर्षीय कॉन्स्टेबल मंगेश कांबळेंचा काल सकाळी केईएम रुग्णालयात एडमिट करण्यात आल्यानंतर १० मिनिटांतच मृत्यू झाला. मंगेश कांबळेना कोवीड १९ ची लागण झाल्याची शंका आहे. ते १० दिवस अस्वस्थ होते. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईचे मंगेश कांबळे बळी ठरले. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला केली आहे, तर दुसरीकड़े प्रशासन कांबळे यांच्यावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याची घाई करत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कोवीड योध्दा असलेले कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, यंत्रणांच्या दुर्लक्षेमुळे कांबळे यांचा मृत्यू झाला का, राज्य सरकारचं दुर्लक्ष का, या सर्व प्रकऱणाची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. कांबळे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र तरीही १० दिवस त्यांनी आपली ड्युटी चोख बजावली. त्यांनी पोलीस दवाखान्यात उपचार घेतले. मात्र इतके दिवस आजार असतानाही पोलीस दवाखान्याने कांबळेंची कोरोना टेस्ट का केली नाही ? यंत्रणांची अत्यावश्यक सेवेत काम कऱणा-या योध्यांच्या आरोग्याबाबत एवढी दिरंगाई का? एकट्या मुंबईत ४० हून अधिक पोलीस योध्द्यांना कोरोनामुळे आपले प्राम गमवावे लागले ही सद्यस्थिती माहित असतानाही आणखी एका पोलिसांच्या जीवाशी हा खेळ का? असा सवाल सोमैया यांनी उपस्थित केला आहे.

Post Bottom Ad