Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

म्हाडा नाशिक ५३० सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्राधान्यमुंबई, दि. २१ डिसेंबर, २०२० :- म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे नाशिक येथील पाथर्डी, आडगाव , मखमलाबाद, पंचक, चेहेडी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ताबा घेण्यास तयार स्वरूपातील ५३० सदनिकांसाठी (रेडी पझेशन ) "प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य " या तत्वावर विक्रीकरिता योजना सुरु करण्यात आली आहे.

अत्यल्प, अल्प, आणि मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांकरिता अर्ज करण्याकरिता उत्पन्न मर्यादा तसेच इतर कागदपत्रे सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला सादर करणे अर्जदारास बंधनकारक राहील, तसेच उपरोक्त योजनेतील काही सदनिका नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती व विमुक्त जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. आरक्षित गटातील अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे बंधनकारक राहील अशी माहिती अशी माहिती नाशिक मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा जायभये यांनी दिली. आरक्षणाचा तपशील अर्ज विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील या गृहनिर्माण योजनांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त असून जीएसटी लागू नसल्याने या सदनिका अत्यंत परवडणाऱ्या दरात नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहेत. अटी व शर्ती शिथील करून प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वाटप केल्या जाणाऱ्या या सदनिकांमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी नाशिकमधील मखमलाबाद येथील मध्यम उत्पन्न गटाकरिता ८०, आडगाव येथील ९०, पाथर्डी शिवारातील ६७ आणि म्हसरूळ येथील ७ सदनिकांचा समावेश आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी नाशिक मधील आडगाव येथे ७०, रेल्वे लाईनजवळ पंचक येथे ५५ सदनिका आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील बोरावके नगर जवळ टू बीएचकेच्या ७५, वन बीएचकेच्या ३७ सदनिका उपलब्ध आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी नाशिक मधील आडगाव येथे वन आरकेची १ सदनिका आणि वन बीएचकेच्या ४८ सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी पंधरा हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे.

प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीस उपलब्ध सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. म्हाडा नाशिक मंडळाच्या गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, आयकर भवन समोर येथील मिळकत व्यवस्थापक यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत अर्ज विक्रीस उपलब्ध असून मुंबई येथे म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील जनसंपर्क विभाग कक्ष क्रमांक १९ मध्ये देखील सदरील अर्ज विक्रीस उपलब्ध करवून देण्यात येणार आहेत. या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विस्तृत माहिती करीता म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://mhada.gov.in यावर भेट द्यावी , असे आवाहन नाशिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom