मुंबईतही बर्ड फ्लूमुंबई - देशात व नंतर राज्याच्या काही भागात घबराट निर्माण करणा-या बर्डफ्लूने आता मुंबईतही शिरकाव केला आहे. मुंबईत कावळ्यांचा मृत्यू हा बर्डफ्लूने झाल्याची धक्कादायक माहिती पुण्याच्या पशुसंवर्धन प्रयोग शाळेच्या तपासणी अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर आता बर्डफ्लूनेही मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकली आहे. 

राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतही चेंबूरच्या टाटा कॉलनीत ९ व गिरगाव येथील बालोद्यानात १२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर पालिका प्रशासन अलर्ट होत या मृत कावळ्यांचे नमुने पुण्याच्या पशुवैद्यकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या अहवालात हे नमुने पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या काही भागात शेकडो कोंबड्या, पक्षी मृत झाल्याच्या घटनेनंतर चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात ९ तर गिरगाव चौपाटी येथील बालोद्यानातही दोन दिवसांत १२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. बर्डफ्लूच्या पार्श्वभूमीवर अलर्ट होत महानगरपालिकेने मृत कावळ्यांचे नमुने पुण्याच्या पशू संवर्धन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालात हे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. लातूर, परभणीत शेकडो कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता मुंबईतही बर्डफ्लूचा धोका असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
Previous Post Next Post