बर्ड फ्लूच्या धास्तीने मुंबईत अंडी, चिकणकडे ग्राहकांची पाठ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बर्ड फ्लूच्या धास्तीने मुंबईत अंडी, चिकणकडे ग्राहकांची पाठ

Share This

मुंबई -  मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असतानाच आता बर्डफ्लूनेही शिरकाव केला आहे. या धास्तीने चिकन, अंडी नकोरे बाबा.. असे म्हणत मुंबईत ग्राहकांनी चिकन व अंड्यांच्या दुकानांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्राहकांअभावी चिकन, अंडी व्यावसायिकांना फटका बसला आहे.  

राज्याच्या काही भागात बर्डफ्लूने शिरकाव केल्यानंतर काही दिवसापासून अंड्यांच दर घसरले होते. अनेकांनी चिकनही नको म्हणून पाठ फिरवली. रविवारी चिकणच्या काही दुकानासमोर रोजची गर्दी ओसरल्याचे चित्र होते. त्यामुळे चिकण, अंड्यांचे दर घसरले आहेत. या आधी कोरोनामुळे चिकण, अंडी खाण्याचे लोकांनी बंद केले होते. त्यामुळे व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला होता. आता बर्डफ्लूच्या धास्तीने पुन्हा चिकण व्यावसायिकांना फटका बसला आहे. त्यामुळे चिकणपेक्षा मासे खरेदीकडे लोकांचा कल वाढला असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages