५, ६ जानेवारी मुंबईत १५ टक्के पाणीकपात

Anonymous
0


मुंबई, दि. १ - येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंट दुरुस्ती कामामुळे मंगळवारी ५ जानेवारी रोजी सकाळी १० ते बुधवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मानखुर्द, चेंबूर, मुलुंड वगळता संपूर्ण मुंबईभर ही पाणीकपात असेल.मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या २४०० मिलिमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम ५ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे.

या दुरुस्ती कामामुळे मुंबई महानगराच्या बहुतांश भागातील पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. शहर विभागात ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण म्हणजे कुलाब्यापासून धारावीपर्यंत १५ टक्के कमी पाणीपुरवठा होईल.

पश्चिम उपनगरात एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिणपर्यंत म्हणजे वांद्र्यापासून दहिसरपर्यंत, तर पूर्व उपनगरात एल, एन, एस म्हणजे कुर्ला ते भांडुपपर्यंत पाणीकपात होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी या कालावधीत पाण्‍याचा गरजेपुरता साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)