९ लाख बेशिस्त मुंबईकर विनामास्क, १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2021

९ लाख बेशिस्त मुंबईकर विनामास्क, १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल



मुंबई - कोरोनाला हरविण्यासाठी मास्क अनिवार्य केला असला तरी मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ९ लाख २५ हजार बेशिस्त मुंबईकर विनामास्क फिरताना आढळून आले. सुमारे १८ कोटी ८७ लाखाचा दंड महापालिका, क्लिन-अप मार्शलने त्यांच्याकडून वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, हात धुणे, गर्दी टाळण्याचे निर्देश आहेत. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत या नियमांना फाटा दिला जात आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. संबंधितांवर कारवाईसाठी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार २४ प्रभागातील गर्दीच्या ठिकाणांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच प्रत्येक वॉर्डातील मनपा कर्मचारी - अधिकारी आणि क्लिन- अप मार्शल संस्थेमार्फत कारवाई सुरु आहे. तरीही विनामास्क फिरण्यांची संख्या वाढते आहे. गुरुवारी (ता.३१) सुमारे १३ हजार १७९ मुंबईकर विनामास्क आढळले. २६ लाख ३५ हजार ८०० रुपयांचा दंड एकाच दिवशी आकारल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

वर्षभरात ९ लाख मुंबईकर विनामास्क -
मास्क लावणे बंधनकारक असताना नोव्हेंबरमध्ये ४ लाख ८५ हजार ७३७ लोक विनामास्क आढळून आले. कारवाईनंतर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल, असा प्रशासनाचा दावा होता. परंतु, उलट यात वाढ झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत ९ लाख २५ हजार ५७२ लोक विनामास्क आढळली आहेत. सुमारे १८ कोटी ८७ लाख ४८ हजार ६०० रुपये दंड त्यांच्याकडून वसूल केला.

दादर, परळ भागात सर्वाधिक कारवाई -
दादर, परळ, माटुंगा, शिवडी, वडाळा, माहिम भागात सर्वाधिक १ लाख ६९ हजार ४७० लोक विनामास्क होते. त्या खालोखाल अंधेरी, गोरेगाव आणि मालाड भागात १ लाख ४२ हजार ५८५ मुंबईकर विनामास्क आढळले. कुलाबा, फोर्ट, चर्चगेट, गिरगाव, ग्रॅण्टरोड आणि मुंबई सेंट्रल भागात १ लाख ३१ हजार, तर खार, सांताक्रुज, अँधेरी, भांडूप, घाटकोपर, मुलुंड, दहिसर, बोरीवली आणि कांदिवली भागात १ लाख २२० हजार मुंबईकर आढळले आहेत. गोवंडी, मानखूर्द आणि कुर्ला परिसरात सर्वाधित कमी १ लाख ६ हजार सर्वाधिक लोक आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS