50 युवकांशी लग्न करून पळून जाणारी नवरी, अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

50 युवकांशी लग्न करून पळून जाणारी नवरी, अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

Share This

पुणे – विवाह इच्छुक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासबोत खोटे लग्न करुन पैसे, दागिने घेऊन पळून जाणाऱ्या नवरीच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील 9 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक कुटुंबांना लुटल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मुख्य आरोपी ज्योती रविंद्र पाटील (वय 35 रा. केसनंद फाटा वाघोली) या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वापी आणि कोल्हापूर येथील नागरिकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मावळातील 32 वर्षीय तरुणाने वडगावं मावळ पेालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages