पालिकेचे दवाखाने दोन पाळ्यांमध्ये

0


मुंबई - कोरोनाचे संकट त्यात पावसात पसरणाऱ्या साथीच्या आजारांचे आवाहन मुंबई महापालिके उभे ठाकले आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवत रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी आणखी १३ दवाखाने दोन पाळ्यांमध्ये म्हणजे रात्री ११ वाजेपर्यंत सुरु करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. दरम्यान, सध्या १७ दवाखाने रात्री ११ पर्यंत सुरु ठेवण्यात येत आहेत.

महानगर पालिकेचे १८६ दवाखाने आहेत. हे दवाखाने प्रामुख्याने सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत सुरु असतात. मात्र ही वेळ अपुरी असून रात्री उशीरापर्यंत दवाखाने सुरु करण्याची मागणी नागरीक व लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्यानुसार अंधेरी पुर्व आणि बोरीवली येथील दवाखाने महानगर पालिकेने सकाळी ८.३० ते ११.३० आणि संध्याकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत सुरु ठेवण्यात आले. त्यानंतर खासगी संस्थांच्या मदतीने पालिकेने १५ दवाखाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत पालिकेच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमार्फत हे दवाखाने चालवले जातात. तर त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत हे दवाखाने खासगी संस्थांच्या माध्यमातून चालवेल जातात. या दवाखान्यांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता १३ दवाखानेही रात्री ११ वाजेपर्यंत सुरु करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. शिवसेनेचे दत्ता फोंडगे यांनी दवाखाने रात्रीपर्यंत सुरु ठेवण्याची ठरावाची सुचना मांडली होती. त्यावर प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)