राज्यातील शाळांना १ मे ते १३ जून उन्हाळी सुट्टी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील शाळांना १ मे ते १३ जून उन्हाळी सुट्टी

Share This


मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा ऑनलाइन सुरू आहे. मात्र आता या ऑनलाइन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून, १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शाळेतून सुट्टी मिळाली आहे. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार आहे, तर विदर्भातील तापमान लक्षात घेता, २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील शिक्षक संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शुक्रवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्ट्यांबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे. यानुसार १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages