कोरोना - आज नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली घसरली

0


मुंबई: राज्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली असताना नव्या रुग्णांच्या संख्येत घट देखील होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार ६४७ इतकी होती. तर आज एकूण ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५१ हजार ३५६ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत आज घट झाली असून हा फरक ८ हजार ०२६ इतका आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ६५ हजार ८७० वर आली आहे.

आज राज्यात एकूण ५६७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ६६९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०७ टक्क्यांवर आले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या किंचित घटली -
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ५६ हजार ८७० इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख ०८ हजार ९१५ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५९ हजार ९७० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४७ हजार ४९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७० हजार १८६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार १९५ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये २३ हजार १४५ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १३ हजार ४०९, नांदेडमध्ये ही संख्या ७ हजार ९५६ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार ५९२, तसेच तर रायगडमध्ये एकूण १२ हजार १६९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ७ हजार ५८८, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ४८३ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार २२८ इतकी आहे.

३९,०८,४९१ व्यक्ती होम क्वारंटाइन -
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७८ लाख ६४ हजार ४२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७ लाख ७१ हजार ०२२ (१७.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ०८ हजार ४९१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २८ हजार ५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)