मुंबईत ४७ दिवसांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2021

मुंबईत ४७ दिवसांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद



मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ६६२ नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून गेल्या ४७ दिवसांतील ही सर्वात निचांकी रुग्णसंख्या ठरली आहे. मुंबईत गेले काही दिवस करोनाचा ग्राफ वेगाने खाली येत असून त्यात आजचे आकडे खूप दिलासा देणारे ठरले आहेत.

मुंबईवरील करोनाचा विळखा सैल होत आहे. शहरात सातत्याने नवीन बाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. आज मुंबई पालिका क्षेत्रात २ हजार ६६२ नवीन बाधितांची भर पडली आहे तर त्याचवेळी ५ हजार ७४६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात ७८ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार आज एकूण २३ हजार ५४२ चाचण्या घेण्यात आल्या.

मुंबईतील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. आजच्या नोंदीनुसार हा आकडा सध्या ५४ हजार १४३ इतका आहे. रुग्णवाढीला ब्रेक लागल्याने व दररोज करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चांगले संकेत मिळत आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९ टक्के झाले आहे तर रुग्णवाढीचा दर ०.६१ टक्के इतका खाली आला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींमध्ये सध्या ९३ सक्रिय कंटेनमेंट झोन असून ८१४ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad