महालक्ष्मी धोबीघाट जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 June 2021

महालक्ष्मी धोबीघाट जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबामुंबई - महालक्ष्मी येथील प्रसिद्ध धोबीघाट येथे 1994 पासून कार्यरत असलेल्या धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले सार्वजनिक शौचालय नूतनीकरण करण्याच्या निमित्ताने संस्थेकडून काढून घेण्यात आल्या विरोधात स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबा राहिल, असे भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देण्यासाठी घाट घाटला आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज याबाबत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी धोबी घाटात जाऊन पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी आपले म्हणणे स्थानिकांनी मांडले. ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था दर ही वाढविणार आहे. तसेच शौचालयाचे काम पुर्ण झाले. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर शौचालयाचे लोकार्पण कार्यक्रम झाला पण शौचालय खुले केलेले नाही. दर काय असतील हे सांगितले जात नाही. त्यामुळे स्थानिक आंदोलन करणार असल्याचे यावेळी स्थानिकांनी आमदार अँड आशिष शेलार यांना सांगितले.

दरम्यान याबाबत आमदार अँड आशिष शेलार यांनी. सांगितले की, याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी आपण चर्चा केली असून पुन्हा याबाबत चर्चा करु. स्थानिकांची संस्था हे शौचालय चालवण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत असून त्यांच्या कडून एकाकी काम काढून घेणे अन्याय कारक आहे. ते काम काढून घेतले? ते कधी सुरू होणार? दर किती असणार? महापौरांनी या सगळ्याची उत्तरे देणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विरोध असून त्या विरोधात ते जन आंदोलन करणार आहेत. भाजपाचा या आंदोलनाला पाठींबा असेल, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले. 

Post Top Ad

test