मुंबईत चार महिन्यांतील सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, २४ तासात ५२९ नवीन रुग्ण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत चार महिन्यांतील सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, २४ तासात ५२९ नवीन रुग्ण

Share This


मुंबई - मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने घटते असून मागील २४ तासात ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वाधिक कमी रुग्ण आढळले आहेत. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

रविवारी ७०० नवीन रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या घटते आहे. २४ तासांत ५२९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ७२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख १७ हजार १०८ वर गेली आहे. तर ६ लाख ८४ हजार १०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १५२०२ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत १५५५० सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मागील २४ तासांत २०१३३ चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९५ टक्के झाला आहे. तर कोरोना वाढीचा दर ०.१० टक्केवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६७२ वर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages