कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण बनावट

Anonymous
0


मुंबई - कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत बनावट लसीकरण केल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे. पालिकेची परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करता बनावट लसीकरण करण्यात आल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. पालिकेच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला असून कांदिवली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत अलिकडेच बनावट लसीकरण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलीसांनी संबंधितांना अटकही केली आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल उपआयुक्त विश्वास शंकरवार यांनी महानगरपालिका प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात संपूर्ण लसीकरण बनावटरित्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीकरणासाठी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करताच संबंधितांनी लसीकरण केले. त्यासाठी अनधिकृत पद्धतीने लससाठा मिळवल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चार संशयितांना अटक केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)