स्विस बँकांतील भारतीयांचा निधी तिपटीने वाढला! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2021

स्विस बँकांतील भारतीयांचा निधी तिपटीने वाढला!



नवी दिल्ली - भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतवलेला निधी हा २०२० अखेरपर्यंत २.५५ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे.

गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटकाळातील घसरणीच्या प्रवाहातही २०२० मधील भारतीयांच्या स्विस बँकांतील एकूण निधीने गेल्या १३ वर्षांतील सर्वोच्च स्तर गाठला आहे. २०१९च्या अखेरीस ८९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६,६२५ कोटी रुपये) असणाऱ्या निधीत वर्षभराच्या कालावधीत तिपटीहून मोठी वाढ झाली आहे.

यापूर्वी २००६ मध्ये भारतीयांच्या निधीने ६.५ अब्ज स्विस फ्रँक अशी विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतरच्या वर्षात मात्र त्याला उतरती कळा लागली होती. रोखे अथवा तत्सम साधनांद्वारे भारतीयांच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असली, तरी ठेवींच्या रूपातील भारतीयांचा पैसा मात्र घसरत आला आहे.

स्विस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम २० हजार कोटींच्या पुढे गेली आहे. एकीकडे खासगी बँक खात्यात जमा केलेली रक्कम खाली आली असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्युरिटीज व इतर मार्गांनी बरीच रक्कम जमा केली आहे. बँकेच्या माहितीनुसार, यापूर्वी २००६ मध्ये भारतीय ठेवींनी ६.५ अब्ज स्विस फ्रँकची विक्रमी नोंद गाठली होती; परंतु त्यानंतर २०११, २०१३ आणि २०१७ वगळता भारतीयांनी स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नाही; परंतु २०२० ने जमा रक्कमेचा सर्व आकड्यांचे रेकॉर्ड मोडले. २०२० मध्ये जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे ४००० कोटी रुपये होते, तर इतर बँकांमार्फत ३१०० कोटी रुपये जमा झाले. तसेच सर्वाधिक १३ हजार ५०० कोटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले आहेत. ही आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad