महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० दिवसांनी वाढला, डबलिंग रेट ८५० दिवसांपार

Anonymous
0


मुंबई - मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे समाधानकारक चित्र आहे. महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० ने वाढून ८५० दिवसांपार गेला आहे. तर चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोन, सील इमारती व मजल्यांमधील तब्बल निर्बंधांतून ४ लाख ४२ हजार रहिवाशी मुक्त झाले आहेत. 

मुंबईत फेब्रुवारीत आलेल्या दुस-य़ा लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. रुग्णांची संख्या तब्बल ११ हजारांवर पोहचल्याने पालिकेसमोर आव्हान उभे राहिले होते. मात्र प्रशासनाने लागू केलेले कड निर्बंध व प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे सध्या अनलॉक प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. मागील महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० ने वाढला आहे. तर चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोन, सील इमारती व मजल्यांमधील निर्बंधांतून ४ लाख ४२ हजार रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे.
....
इमारतीतील २०९६ मजले सील -
सद्यस्थितीत एकाच ठिकाणी कमी रुग्ण आढळत असल्यामुळे पालिकेने मजल्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत केवळ ६८ संपूर्ण इमारती सील असून २०९६ मजले सील आहेत.

अशी आहे सद्यस्थिती -
- चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोन - १३
- एकूण पूर्ण सील इमारती - ६८
- इमारतींमधील सील मजले - २०९६
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)