मुंबईत दुकानदारांकडून पैशाची वसुली - मनसेचा आरोप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दुकानदारांकडून पैशाची वसुली - मनसेचा आरोप

Share This


मुंबई - अनलॉक प्रक्रियेत मुंबई सध्या लेव्हल तीनमध्ये असून काहीअंशी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या नुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मात्र वेळेच्या मर्यादेनंतरही दुकाने सुरु ठेवणा-य़ा दुकानदारांकडून पैशाची वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मुंबईत वेळेची मर्यादा संपल्यानंतरही छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने सर्रास सुरू ठेवली जात आहेत. ही दुकाने सुरु ठेवण्यासाठी त्यांच्याकडून पैशाची वसुली केली जाते, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने चारपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी आहे. मात्र असे असताना अनेक ठिकाणी दुकाने चारनंतरदेखील उघडी ठेवली जात आहेत. मोठ्या दुकानांकडून ५ हजार , मध्यम दुकानांकडून २ हजार तर छोट्या दुकानांमधून १ हजाराची वसूली केली जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages