ओमायक्रोन - मुंबईतील ९ परदेशी प्रवासी कोरोना पोजिटिव्ह

Anonymous
0


मुंबई - दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोना विषाणूचा ओमायक्रोन या नवीन व्हेरियंटचा प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९ प्रवासी कोरोना पोजिटिव्ह आले आहेत. यात लंडन येथून आलेले ५, जर्मनी, मॉरिशस, पोर्तुगाल आणि साऊथ आफ्रिका येथून आलेले प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जिनोम सिक्वेनसिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत. 

९ प्रवासी कोरोना पोजिटिव्ह -
जगभरात ओमायक्रोन विषाणूचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा करून त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान ४० देशातून २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी ४८५ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९ प्रवासी कोरोना पोजिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. 

परदेशी प्रवाशांच्या चाचण्या -
दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोना विषाणूचा ओमायक्रोन हा व्हेरियंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच त्यांना क्वारेंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई विमानतळावर गेल्या १५ ते २० दिवसात जे प्रवासी परदेशातून आले आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या विभागवार असलेल्या वॉर रूममधून या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत असून जे रुग्ण पोजिटिव्ह आढळून येत आहेत त्यांना क्वारेटाईन केले जात आहे. त्यांची जिनोम सिक्वेनसिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)