मुंबईतील पुलांचे दर ६ महिन्यांनी होणार ऑडिट, पालिकेचा निर्णय

JPN NEWS
0


मुंबई - मुंबईतील पुलांची आता सहामाही  तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट  (bridge structural audit) करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. ५ वर्षांसाठी याचे काम दिले जाणार आहे. वर्षातून दोन वेळा ही तपासणी करण्यात येणार असून यात प्रामुख्याने पिलर, स्लब, जोडणी याची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबईत महापालिकेचे २७४ पूल आहेत. त्यातील ९० टक्के पूल हे ४० वर्ष जुने आहेत. तर, दक्षिण मुंबईतील पुल हे १०० वर्षांच्या आसपासचे आहे. या पुलांची बांधणी त्यावेळीची वाहतूक, पादचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पादचाऱ्यांसह, वाहनांची संख्याही वाढली आहे.पुलांवरील ताण वाढल्याने पुलांच्या तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल मे आणि डिसेंबर महिन्यात सल्लागाराला सादर करायचा आहे. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा संपल्यावर तत्काळ दुरुस्तीची कामे हाती घेता येतील. पुलात मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची गरज असल्यास ती कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत असे असे पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. नैसर्गिक आपत्तीसह अपघात, वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यास किंवा नियमीत तपासणीत पुलात काही उणिवा आढळल्या तर पुलाचे ऑडीट करण्यात यावे अशी अटही या कंत्राटात आहे.

कशी होणार तपासणी - 
पुलांची तपासणी करताना कामाचे तसेच पुलाच्या स्थितीचे छायाचित्र काढले जाईल. शिवाय चित्रीकरणही केले जाणार आहे. यात पिलर पुलावरील रस्ता, पर्जन्यवाहीन्या, बेरींग तसेच पुलातील महत्वाच्या भागांची तपासणी करायची आहे. तसेच वर्षातून एकदा पुलाची तपासणी करताना पाण्यात असलेला पाया तपासणी, पिलरची तपासणी करणे पुलावर असलेले भारही तपासले जाणार आहे. तसेच वहाने, पादचाऱ्यांचे सर्वेक्षणही करण्यात येईल.

मुंबईतील पुल  -
उड्डाण  पुल - १२७
रोड ओव्हर ब्रिज - ५०
पादचारी पुल- ४४
रेल्वे पादचारी पुल ३५
वाहतूक  भुयारी मार्ग ९
पादचारी भुयारी मार्ग १९
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !