२७ जानेवारीला चेंबूर, गोवंडी, मानखुर्द विभागात १८ पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2022

२७ जानेवारीला चेंबूर, गोवंडी, मानखुर्द विभागात १८ पाणीपुरवठा बंद



मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरुवार, दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत एम/पूर्व आणि एम/पश्चिम या विभागांमधील खालील नमूद परिसरात १८ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (Water cut) राहणार आहे. पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना केली आहे.

या विभागात पाणी बंद -
एम/पूर्व विभाग - टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग; देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड; लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत; जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत; सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे; देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहत 

एम/पश्चिम विभाग - साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर; प्रभाग क्रमांक १५२ - सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर; घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क; चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी; लाल डोंगर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad