Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राणी बागेसाठी ११५ कोटी रुपयाची तरतूदमुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) नवनवीन सुविधा देण्यासाठी आधुनिकीकरण प्रकल्प राबविले जात आहे. त्यासाठी पालिकेच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ११५ कोटी रुपयाची तरतूद केली आहे. राणी बागेच्या आधुनिकीकरण प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात पाणमांजर, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा या वन्यजीवांसाठीचे प्रदर्शनीय बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, मुंबईकरांना लवकरच नवीन वन्यजीव पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. (115cr to Mumbai zoo)

मुंबई पालिकेकडून राणी बागेसाठी विविध उपक्रम, योजना आखल्या जातात. नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने १३ फेब्रुवारी २०१९ मध्ये मंजूर केलेल्या आराखड्यानुसार राणी बागेत विविध आधुनिकीकरण प्रकल्पाचे कामे टप्प्यात केली जात आहेत. त्यासाठी पालिकेच्या २०२०-२१ अर्थसंकल्पात दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांसाठी ४३ कोटी रुपये खर्च झाला असून २०२२-२३ च्या पालिका अर्थसंकल्पात ११५.४६ कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे.

राणी बागेच्या आधुनिकीकरण प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात पाणमांजर, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा या वन्यजीवांसाठीचे प्रदर्शनीय बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नवीन संकल्पासह उद्यान विकसित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणिसंग्रहालयलगतच्या सुमारे १० एकर इतक्या दोन भूखंडावर विस्तार केला जाणार आहे. त्यात, जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार आदी प्राण्यांसाठी प्रदर्शनी तयार करण्यात येत आहेत. त्यातील निविदा प्रक्रिया काम अंतिम टप्प्यात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom