चारकोपमध्ये "नो रोड नो व्होट" लिहून नागरिकांनी केला मतदानाला विरोध

Anonymous
0


मुंबई - दर पाच वर्षांनी मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार, नेते मतदारांच्या पुढे जातात. नंतर मात्र या राजकीय पुढाऱ्यांना मतदारांचा विसर पडतो. असाच विसर पडलेल्या नेत्यांना कांदिवली चारकोप येथील मतदारांनी दणका दिला आहे. सोसायटीबाहेरील रस्ता बनवला जात नसल्याने "नो रोड नो व्होट" लिहून नागरिकांनी केला मतदानाला विरोध केला आहे. (No Road No Vote)

मुंबईतील कांदिवली चारकोप गावात असलेल्या हायलँड कॉम्प्लेक्समधील लोकांनी बीएमसी निवडणुकीपूर्वी नो रोड नो व्होट लिहून मतदानाला विरोध केला आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की ही सोसायटी पंचवीस वर्षांपूर्वी तयार झाली होती, त्यानंतर हा रस्ता देखील बनवला आहे, परंतु गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता खराब आहे. हा रस्ता नव्याने बनवण्यात यावा अशी मागणी बीएमसीकडे केल्यावर   हा खासगी रस्ता आम्ही बांधू शकत नाही असे सांगितले जाते. स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक यांच्याकडे गेलो तर तेही म्हणतात हा खासगी रस्ता आहे, इथे आमचा निधी पास होऊ शकत नाही. राजकीय नेते इथे मते मागायला येतात, पण ते रस्ते बनवत नाहीत, इथल्या नेत्यांना हा रस्ता बनवता येत नाही, मग आम्ही त्यांना मतदान का करायचे, त्यामुळे "नो रोड नो व्होट" असे लिहिले आहे असे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)