Type Here to Get Search Results !

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील 42 कामे पूर्ण, 13 प्रगतीपथावरमुंबई, दि. 16 : ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत 58 कामांपैकी 42 कामे पूर्ण झालेली असून 13 कामे प्रगतीपथावर आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत (Brimstowad Project) प्रस्तावित एकूण 8 पर्जन्य जल-उदंचन केंद्रापैकी 6 पर्जन्य जल उदंचन केंद्रासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोगरा येथे पर्जन्य जल-उदंचन केंद्रासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी जागेच्या मालकीबाबत प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ सर्वेक्षण व आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल 2009 ते मार्च 2021 या कालावधीत नाले सफाईच्या कामाकरिता 1136 कोटी खर्च केले आहे. सन 2015-2016च्या नालेसफाईच्या कामांमध्ये गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर मनपा आयुक्तांनी 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी एक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्याच्या विरूद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच नालेसफाईच्या गैरव्यवहार प्रकरणी पहिल्या टप्प्यात 13 तर दुसऱ्या टप्प्यात 80 अशा 93 कर्मचाऱ्यांवर चौकशी पूर्ण करून 70 अपचारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक शिक्षेचे शिक्षादेश बजाविण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, विजय उर्फ भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad