घर विकताना सोसायटीच्या एनओसीची आवश्यकता नाही - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Anonymous
0

मुंबई - घराच्या मालकाचा त्याच्या घरावर पूर्ण हक्क असतो.  आपले घर कोणाला विकायचे हे त्याने ठरवायचे आहे.  घरमालकाला आपले घर विकायचे असेल तर सोसायटीच्या परवानगीची काय गरज? असे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे आहे.

पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडली. सदनिका विकण्यासाठी सोसायटीची परवानगी आवश्यक होती, मात्र आव्हाड यांनी ही प्रथा रद्द केली आहे. आपले घर कोणाला विकायचे हा घरमालकाचा अधिकार असल्याचे आव्हाड म्हणाले. आव्हाड म्हणाले की, काही इमारतींमध्ये जातीनुसार घरे विकली जातात. जर घर मालक गुजराथी असेल तर गुजराथी, जैन असेल तर जैन आणि शाकाहारी असेल तर शाकाहारीला घर विकतात. त्यामुळे महाराष्ट्राची विभागणी वेगवेगळ्या विभागात होत आहे. राज्याची विभागणी होऊ नये म्हणून सर्वांना एकत्र करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे आव्हाड म्हणाले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)